सातारा – जिल्ह्यात 106 जणांनी केली करोनावर मात
Updated On:

सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 106 नागरिकांना मंगळवारी घरी सोडण्यात आले. आणखी 305 नागरिकांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 33, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 22, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 17, कोरेगावमधील 14, वाईतील 18, खंडाळ्यातील 12, रायगावमधील 17, पानमळेवाडीतील 50, महाबळेश्वरमधील पाच, दहिवडीतील 12, खावलीतील 44 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 61, अशा एकूण 305 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.





