सरसंघचालक घेणार जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन
Updated On:

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे येत्या ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांसाठी पुणे जिल्ह्यात येणार आहेत. येत्या गुरुवारी ५ सप्टेंबरला सकाळी ९,३० वाजता श्रीक्षेत्र जेजुरी येथील अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाचे दर्शन ते घेणार आहेत.
या वेळी श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे त्यांचे स्वागत करण्यात येईल, तसेच जेजुरी गडावरील द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे भूमिपूजन आणि कोनशिला उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते होणार आहे. पुणे शहरात काही अंतर्गत बैठका आणि फक्त निमंत्रितांसाठी असणाऱ्या दोन जाहीर कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.





