Satara | कराड पालिका नगरवाचनायाची उद्यापासून शारदीय व्याख्यानमाला

कराड, (प्रतिनिधी) – नगरपरिषदेच्या नगरवाचनालयाच्या शारदीय व्याख्यानमाला ९२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गुरुवार, दि. ३ ऑक्टोबरपासून या शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ होत आहे. व्याख्यानमालेस श्रोत्यांची गर्दी असते.
कराडला येवुन शारदीय व्याख्यानमालेत आपली हजेरी लावण्यातही वक्त्यांना आपला गौरवच वाटतो, म्हणुन नामवत वक्तेही या शारदीय व्याख्यानमालेत सहभागी होण्यास उत्सुक असतात. सर्व व्याख्याने यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणार आहेत.
गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी व्याख्यानमालेचा शुभारंभ ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार व व्याख्याते दादासाहेब सुतार यांच्या ‘श्री उत्तरालक्ष्मी ‘कराड शिल्पसौंदर्य १२ वे शतक (स्लाईड शो सह विवेचन) या व्याख्यानाने होणार आहे.
शुकवार, दि. ४ रोजी वेदस्पर्श हृदयरोग निवारण केंद्र आणि रिसर्च सेंटर, नांदेड येथील डॉ. भारती मढवई (येवलीकर), यांचे ‘चला नाती जपूया, शनिवार, दि. ५ रोजी केल्विन व लिक्विगॅस कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल वानखेडे यांची ‘गोष्ट पैशापाण्याची’ हा प्रकट मुलाखत होणार आहे. ही मुलाखत मुक्त पत्रकार संपत मोरे हे घेणार आहे.
रविवार, दि. ६ रोजी प्रसिध्द व्याख्याते डॉ. विठठल लहाने यांचे ‘यशाचा पासवर्ड’, सोमवार, दि. ७ रोजी ह.भ.प. रोहिणीताई परांजपे, पुणे यांचे ‘मातृमहिमा’, मंगळवार, दिनांक ८ आक्टोंबर २०२४ रोजी सौ. सीमा रामदास पाटील, कोल्हापूर यांचे ‘स्त्री समजून घेताना’ बुधवार, दि.९ रोजी राज्यशासन पुरस्कार प्राप्त इतिहास लेखक राजेंद्र घाडगे,
सातारा यांचे ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराजः एक अलौकिक व्यक्तिमत्व’, गुरुवार, दि. १० रोजी सर्टिफाईड माउंटेनर योगेश आलेकरी यांचे “मुंबई लंडन मुंबई” बाईकवरुन केलेला साहसी प्रवास (स्लाईड शो सह विवेचन) व शुकवार, दि. ११ रोजी झी मराठीचे पहिले हास्यसम्राट विजेते प्रा. दीपक देशपांडे यांचा ‘हास्यकल्लोळ’ हा तुफान हास्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
अशाप्रकारे एकूण ९ व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. या सर्व व्याख्यानास रसिक श्रौंतृवृंदानी, विद्यार्थीवर्गानी उपस्थित राहून त्याचा व्याख्यांनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी केली आहे.





