सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदीचे ब्रेकअप; कुटुंबियांच्या भेटीनंतर नातं तुटलं?

Siddhant Chaturvedi-Sara Tendulkar Break Up | भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरच्या मागील काही दिवसांपासून सिद्धांत चतुर्वेदीसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. मात्र आता दोघांचेही ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या कुटूंबाची नुकतीच भेट झाली. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. सिद्धांतने स्वतःहून साराशी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. पण त्याने हा निर्णय का घेतला याचं कारण अजून समोर आलेले नाही. यानंतर एकमेकांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर दोघांनीही रिलेशन संपवण्याचा निर्णय घेतला का? अशी चर्चाही सोशल मीडियावर पाहायला मिळते आहे.
सिद्धांत चतुर्वेदीच्या आधी साराचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं गेले होते. दरम्यान, शुभमन गिलनं ती अफवा असल्याचं म्हटलं आणि तो कोणालाही डेट करत नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं.
सिद्धांत चतुर्वेदीबद्दल सांगायचं तर, त्याचं नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत जोडलं गेलेलं. नव्या आणि सिद्धांतच्या ब्रेकअपच्या चर्चा बराच काळ रंगल्या होत्या. नव्यासोबतच्या ब्रेकअपनंतर सिद्धांत आणि सारा रिलेशनशिपमध्ये आले होते. Siddhant Chaturvedi-Sara Tendulkar Break Up |
सिद्धांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, त्याने ‘गली बॉय’मधून इंडस्ट्रीत करिअरला सुरुवात केली.यानंतर तो बंटी और बबली 2, गहराईयां, फोन भूत, खो गए हम कहाँ आणि युद्ध यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. आता तो ‘धडक 2’ आणि ‘दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग’मध्ये दिसणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण तिने या चर्चा फेटाळल्या आहेत. Siddhant Chaturvedi-Sara Tendulkar Break Up |
हेही वाचा:





