sara ali khan: केदारनाथमधून सारा अली खानचा व्हिडिओ व्हायरल; शांत बसलेली पाहून चाहते म्हणाले… “फक्त सुशांतची उणीव जाणवते”

sara ali khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा केदारनाथ दौऱ्यातील एक अनदेखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा शांतपणे जमिनीवर बसलेली दिसते आणि आजूबाजूला साधू-संत बसलेले आहेत. तिच्याकडे एक चाहता सेल्फी घेण्यासाठी येतो, पण सारा त्याच्याकडे लक्ष देत नाही. ती विचारात गुंग दिसते.
सारा आणि केदारनाथचं नातं
सारा अली खानने सुशांत सिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासूनच या ठिकाणाशी तिचं एक खास नातं जुळलं आहे. ती अनेकदा केदारनाथच्या यात्रेला जाते.
या वेळच्या तिच्या यात्रेचा व्हिडिओ एका युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात सारा शांतपणे बसलेली दिसते, आणि तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर, विचारमग्न भाव दिसतो.
View this post on Instagram
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी साऱ्याचं कौतुक केलं आहे, तर काहींनी चाहत्यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिलं,
“मंदिरात लोक देवाऐवजी सेलिब्रिटींकडे पाहतात, हे पाहून वाईट वाटतं.”
तर दुसऱ्याने म्हटलं,
“यामुळेच सेलिब्रिटींना वेगळ्या रांगेत दर्शन द्यावे लागतात, कारण लोक त्यांना शांततेत प्रार्थना करू देत नाहीत.”
काहींनी तर असा अंदाज व्यक्त केला की,
“साराला कदाचित सुशांत सिंह राजपूतची आठवण आली असेल.”
काहींनी कमेंट्समध्ये सुशांतचे फोटोही शेअर केले आणि लिहिलं, “फक्त सुशांतचीच उणीव जाणवते.”
साराची भावनिक पोस्ट
आपल्या या यात्रेनंतर साऱ्याने काही फोटो शेअर करत लिहिलं,
“संपूर्ण जगात ही एकच जागा आहे जी आपली वाटते. प्रत्येक वेळी इथे येते तेव्हा नव्या अनुभवाने भारावून जाते. माझ्याकडे जे काही आहे आणि मी जी आहे, त्या सगळ्याबद्दल मी फक्त कृतज्ञ आहे.”
हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना सारा आणि सुशांतच्या ‘केदारनाथ’ चित्रपटातील आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.





