सारा अली खानने कार्तिकला मारली ‘मिठी’

मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा चित्रपट ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सनी देओल आणि ‘गदर 2’च्या निर्मात्यांनी सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये बॉलिवूडच्या सर्व स्टार्सनी प्रवेश केला होता. ‘गदर 2’ च्या सक्सेस पार्टीमध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचीही भेट झाली होती. विशेष म्हणजे दोघांनीही मतभेद विसरून एकमेकांना मिठी मारली.
View this post on Instagram
‘गदर 2’ च्या सक्सेस पार्टीतील सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सलमान खानला मिठी मारल्यानंतर सारा अली खाननेही कार्तिक आर्यनला मिठी मारल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान दोघांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे आहे. सक्सेस पार्टी सोडताना सारा अली खान कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननसोबत दिसत आहे. पार्टीतून बाहेर पडतानाही ती कार्तिक आर्यनला मिठी मारून ‘बाय’ म्हणत निघून जाते.
सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या व्हिडिओवर चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत. एका यूजरने सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांना एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आणि लिहिले की, “हे दोघे पुन्हा एकत्र यावेत.” सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांनी एकमेकांना डेट केले होते. पण ‘लव्ह आज कल 2’ नंतर कार्तिक आणि साराचे ब्रेकअप झाले होते.





