कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला ; सापुतारा घाटात बसचा भीषण अपघात ; ७ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

Saputara Bus Accident । गुजरातमधील डांग जिल्ह्यात आज सकाळी एक भीषण रस्ता अपघातझाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नाशिक-सुरत महामार्गावरील सापुतारा घाटात झाला आहे. यामध्ये खासगी लक्झरी बस दरीत कोसळल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 15 जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे साडेपाच वाजता अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
नाशिक – सुरत महामार्गावर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झाला आहे. यावेळी खासगी बस तब्बल 200 फूट दरीत कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
VIDEO | Gujarat: A bus fell into a deep valley in Dang district, leaving several injured. Deputy SP Sunil Patil says, “Some passengers have been rescued and are undergoing treatment… At around 4:30 am today, a luxury bus coming from Maharashtra overturned near Saputara – a hill… pic.twitter.com/eQNlxgV0Je
— Press Trust of India (@PTI_News) February 2, 2025
भीषण दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू Saputara Bus Accident ।
कुंभमेळ्यावरून परतताना भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. भीषण अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला. अपघात झालेल्या बस मधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती मिळत आहे.
अपघात कसा झाला? Saputara Bus Accident ।
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. जखमींनी पोलिसांकडे त्यांचे जबाब नोंदवले आहेत. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये २ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश होता. रुग्णालयात उपचारादरम्यान २ जखमींचा मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक एसजी पाटील यांनी अपघाताची पुष्टी केली.





