संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर जाऊन घेणार नामदेव शास्त्रींची भेट; थेट पुरावेच सादर करणार

Santosh Deshmukh Case | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. या कारणामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे.
यातच आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे नामदेव शास्त्री महाराज यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. याप्रकरणी दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट घेणार आहे.
देशमुख कुटुंब नामदेव शास्त्री महाराजांना ते पुराव्यांची फाईल देखील सादर करणार आहे. देशमुख यांचे कुटुंब रविवारी सकाळी भगवान गडावर जाणार आहे. बीडमध्ये बैठक घेऊन देशमुख कुटुंब भगवान गडावर जाणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. Santosh Deshmukh Case |
धनंजय देशमुख काय म्हणाले ?
धनंजय देशमुख म्हणाले, ‘बाबांनी बोलले की जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता खुनामुळे खराब झाली पण ही सगळी अपुरी माहिती त्यांच्याकडे असल्यामुळे ते बोलले. खरी माहिती अशी आहे की, खंडणीसाठी ते सगळी आरोपी अवादा कंपनीच्या प्लान्टवर आले होते. त्यांनी आमच्या गावातील दलित बांधवाला मारहाण केली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे. हा पुरावा त्यांना दाखवायला घेऊन जाणार आहोत. गावातील लोक आणि आरोपी यांच्यात वाद झाला पण त्यांची मानसिकता काय होती यापेक्षा त्यांच्यावर किती गुन्हे होते हे कोणी पाहिले नाही,’ असेही धनंजय देशमुख म्हणाले.
‘आरोपींनी किती गुन्हे केले त्याची पण ओरीजनल कॉपी गडावर घेऊन जाणार आणि बाबांना दखवणार आहे. आरोपी हे आरोपी आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. आज माझी लेकर पोरकी झाली, माझा भाऊ गेला आहे. माझा कर्ता भाऊ गेला आहे आता आम्ही आमचा भाऊ कुठुन आणायचा तुम्ही म्हणाले असते तर आम्हाला शिक्षा करून घेतली आहे. आमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन आम्ही भगवान गडावर जाणार आणि त्यांनाच न्याय मागणार आहे,’ असेही धनंजय देशमुख म्हणाले. Santosh Deshmukh Case |
नामदेव शास्त्री काय म्हणाले?
नामदेवशास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे. “धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे. भगवान गड त्यांच्या पाठीशी आहे. धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे.पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव की मुंडे गुन्हेगार नाही. मुंडे यांच्या हाताला सलाईन त्यांनी किती सोसाव?, असा सवालही नामदेव शास्त्री यांनी उपस्थित केला. Santosh Deshmukh Case |
हेही वाचा:





