Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगच्या ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

Santosh Deshmukh Murder Case – जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 77 दिवस उलटूनही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व फौजदार राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनास सुरुवात केली.
मस्साजोग ग्रामस्थांनी बैठक घेत सरकारला 24 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला होता. मस्साजोग ग्रामस्थांनी 17 फेब्रुवारी रोजी रात्री गावातील महादेव मंदिरासमोर बैठक घेतली होती.
तसेच विविध मागण्या मंजूर न केल्यास 25 फेब्रुवारीला अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या संबंधी सोमवारी रात्री मस्साजोग येथे गावकऱ्यांनी बैठक घेऊन अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला. या आंदोलनात गावातील पुरुष- महिलांसह देशमुख कुटुंबही सहभागी झाले.





