सांताक्लॉजची कबर सापडल्याचा दावा

तुर्कस्तानात चर्चमध्ये जमिनीखाली आढळली कबर
रोम – ख्रिश्चन धर्मातील परंपरेप्रमाणे आणि विश्वासाप्रमाणे नाताळच्या कालावधीमध्ये सांताक्लॉज या विषयाला महत्त्व दिले जाते. सांताक्लॉज ही कल्पनारम्यता आहे का वास्तव आहे? याबाबत अधिक संशोधन झाले नसले तरी तुर्कस्तानातील काही संशोधकानी मात्र सांताक्लॉजची कबर शोधण्याचा दावा केला आहे.
ख्रिश्चन धर्मामध्ये सांताक्लॉजची कल्पना ज्या एका ख्रिश्चन संतांच्या अस्तित्वावरून आली होती त्या ख्रिश्चन संताचीच कबर सापडल्याचा दावा या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केला आहे तुर्कस्तानतील “देमरी’ या ऐतिहासिक शहरातील सेंट निकोलसन चर्चच्या खाली भुयारात जमिनीखाली ही कबर आढळली आहे.
ख्रिश्चन धर्मातील प्रख्यात संत मायरा येथील सेंट निकोलस याच्या अस्तित्वावरून सांताक्लॉज कल्पना प्रत्यक्षात आली आहे. या सेंट निकोलस याचीच ही कबर असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. चर्चच्या फरशीखाली सापडलेली ही कबर एका मोठ्या खोलीत असून ती अतिशय सुस्थितीत आहे.
या कबरीचे येत्या कालावधीमध्ये आणखी संशोधन करण्यात येणार आहे. ही कबर अजून उघडण्यात आलेली नाही पण ही कबर सांताक्लॉजचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या सेंट निकोलस याचीच असल्याचा दावा मात्र संशोधकांनी केला आहे





