सुप्रिया सुळेंसह महाराष्ट्रातील ७ खासदारांना ‘संसदरत्न पुरस्कार’ जाहीर; महिलांचा समावेश अधिक

Sansad Ratna 2025 | यंदा संसदरत्न पुरस्कारांसाठी महाराष्ट्राने बाजी मारली आहे. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह 7 खासदारांनी या यादीत स्थान पटकावले आहे.
प्राइम पॉइंट फाउंडेशन’ने दिलेल्या निवेदनानुसार, भर्तृहरि महताब, सुप्रिया सुळे, एन. के. प्रेमचंद्रन आणि श्रीरंग बारणे हे चार खासदार 16वी आणि 17वी लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे खासदार ठरले आहेत. या पुरस्कारांची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने केली आहे. Sansad Ratna 2025 |
सुप्रिया सुळे यांनी 113 प्रश्न पटलावर उपस्थित केले
लोकसभेसह संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरीसाठी खासदार सुळे यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. लोकसभेत सुळे यांची आतापर्यंत 99 टक्के उपस्थिती असून ती राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर 87 टक्के इतकी आहे. संसदेच्या 47 चर्चासत्रांत सहभागी होत खासदार सुळे यांनी 113 प्रश्न पटलावर उपस्थित केले. Sansad Ratna 2025 |
15, 16 व 17 व्या लोकसभेतही त्यांनी अशीच कामगिरी नोंदविली होती. सुप्रिया सुळे यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’ तर्फे सलग दोनवेळा ‘संसद महारत्न’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तब्बल आठ वेळा संसदरत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. यावर्षी 4 खासदारांना त्यांच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी विशेष संसदरत्न सन्मान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या यादीत राज्यातील सात खासदारांपैकी चार महिला खासदार आहेत.
महाराष्ट्रातील कोणाच्या नावांचा समावेश ?
- महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)
- श्रीरंग बारणे (शिवसेना – शिंदे गट),
- अरविंद सावंत (शिवसेना – उद्धव ठाकरे गट)
- नरेश म्हस्के (शिवसेना – शिंदे गट)
- स्मिता वाघ (भाजप)
- मेधा कुलकर्णी (भाजप)
- वर्षा गायकवाड (कॉंग्रेस)
हेही वाचा:





