SansadRatna Awards 2023 : संसदरत्न 2023 पुरस्कारासाठी नामांकने जाहीर, महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश

देशभरातील 13 खासदारांचा समावेश
पुरस्काराची 25 मार्च रोजी होणार घोषणा
नवी दिल्ली – संसदरत्न 2023 पुरस्कारासाठी नुकतीच नामांकने जाहीर करण्यात आली आहे. या नामांकनामध्ये देशभरातील 13 खासदारांचा समावेश असून त्यातील 4 खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप यांच्या प्रत्येकी दोन खासदारांचा समावेश आहे. या पुरस्काराची घोषणा 25 मार्चला करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने 13 खासदारांची नामांकने जाहीर केली. या 13 पैकी लोकसभेतील 8 खासदार असून राज्यसभेतील 5 खासदार आहेत. नामांकने मिळालेल्या खासदारांमध्ये कॉंग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी, कुलदीप राय शर्मा, भाजपचे विद्युत बरन महतो, डॉ. सुकांत मजुमदार, हिना गावित, गोपाळ शेट्टी, सुधीर गुप्ता, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तर राज्यसभेतून सीपीएमचे जॉन ब्रिट्स, राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, सपाचे विश्वंभर निषाद आणि कॉंग्रेसच्या छाया वर्मा यांना नामांकन मिळाले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/filing-false-case-sign-of-cowardly-person-says-sisodia-after-mha-gives-go-ahead-for-prosecution-in-snooping-case/
वित्त समिती (लोकसभा समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा) आणि परिवहन, पर्यटन, संस्कृती समिती (राज्यसभा समितीचे अध्यक्ष व्ही. विजयसाई रेड्डी, वायएसआर कॉंग्रेस) यांना 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून उत्कृष्ट कामगिरीसाठी नामांकित करण्यात आले आहे.
नामांकन देण्याचे निकष काय?
लोकसभेचे 544 आणि राज्यसभेच्या 254 खासदारांपैकी एका संसदरत्नाची निवड केली जाते. त्यासाठी काही निवडक नावे जाहीर केली जातात. यासाठी संसदेतील खासदारांची उपस्थिती, त्यांनी मांडलेली विधेयके, चर्चेतील सहभाग आदी विविध मुद्यांचा विचार करून खासदारांना नामांकन दिले जाते.





