Sanju Samson statement : “तो नसता तर मी आज इथे उभा नसतो…; फायनलमध्ये पोहोचल्यानंतर संजू सॅमसनचं काळजाला भिडणारं विधान!
Sanju Samson statement : या सामन्यात ८९ धावांची खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला 'सामनावीर' घोषित करण्यात आले, मात्र त्याने या विजयाचे सर्व श्रेय जसप्रीत बुमराहला दिले आहे.

Sanju Samson statement on Jasprit Bumrah : टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २५३ धावांचा डोंगर उभारल्यानंतरही इंग्लंडच्या युवा जेकब बेथेलने झळकावलेल्या शतकामुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा ठरला. या सामन्यात ८९ धावांची खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले, मात्र त्याने या विजयाचे सर्व श्रेय जसप्रीत बुमराहला दिले आहे.
संजू सॅमसनचा ‘बॅक टू बॅक’ धमाका –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यानंतर संजूने आपला फॉर्म कायम राखत इंग्लंडविरुद्धही ४२ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीमुळेच भारताला २५३ ही विक्रमी धावसंख्या उभारता आली. या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा तो सामनावीर ठरला आहे.
बुमराह ठरला ‘गेम चेंजर’ –
England needed 45 off 18 balls.
Two set batters at the crease.
The chase was on.
Then came Jasprit Bumrah! 🔥Indeed, we are lucky to witness a once-in-a-generation cricketer! 🙌
ICC Men’s #T20WorldCup | FINAL | #INDvNZ | SUN, 8th MAR, 5:30 PM pic.twitter.com/fzUXZvEIa4
— Star Sports (@StarSportsIndia) March 5, 2026
इंग्लंडचा संघ मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना विजयाच्या समीप पोहोचला होता. मात्र, १८ व्या षटकात जसप्रीत बुमराहने आपल्या अचूक माऱ्याने सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले. बुमराहच्या त्या भेदक स्पेलमुळेच इंग्लंडला २५४ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही.
“हा पुरस्कार बुमराहचाच!” – संजूची कबुली
View this post on Instagram
सामन्यानंतर ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार स्वीकारताना संजू सॅमसन भावूक होत म्हणाला, “आज संघाने ज्या पद्धतीने खेळ दाखवला त्याबद्दल मी समाधानी आहे, पण विजयाचे खरे श्रेय जसप्रीत बुमराहला जाते. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज असून पिढीतून एकदाच असा खेळाडू तयार होतो. खरं तर हा सामनावीर पुरस्कार त्यालाच मिळायला हवा होता. डेथ ओव्हर्समध्ये त्याने जर चांगली गोलंदाजी केली नसती, तर कदाचित मी आज विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी येथे उभा नसतो.”





