आपचे खासदार संजय सिंह यांना नजरकैद ; फारुख अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी गेटवर चढले

Sanjay Singh under house arrest। जम्मू-काश्मीरमधील दोडा येथील आम आदमी पक्षाचे आमदार मेहराज मलिक यांच्या अटकेविरोधात पक्ष आक्रमक झाला आहे. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह एकता दर्शविण्यासाठी श्रीनगरला पोहोचले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये संजय सिंह यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा आपने केला आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी बाहेरून गेट बंद केले. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. याठिकाणी संजय सिंह गेटवर चढले आणि अब्दुल्ला यांच्याशी बोलले.
संजय सिंह यांनी काय दावा केला? Sanjay Singh under house arrest।
संजय सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “हे खूप दुःखद आहे की जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असलेले डॉ. फारुख अब्दुल्ला अनेक वेळा पोलिसांनी मला नजरकैदेत ठेवल्याची बातमी मिळाल्यानंतर सरकारी पाहुणे म्हणून मला भेटायला आले, परंतु त्यांना मला भेटू दिले नाही. जर ही हुकूमशाही नाही तर ते काय आहे?” असे म्हटले आहे.
बहुत दुःख की बात है जम्मू कश्मीर के कई बार मुख्यमंत्री रहे डॉक्टर फारूख अब्दुल्ला जी पुलिस द्वारा मुझे हाउस अरेस्ट किए जाने की ख़बर पाकर मुझसे मिलने सरकारी गेस्ट में आये उन्हें मिलने नहीं दिया गया।
ये तानाशाही नहीं तो और क्या है? pic.twitter.com/MOcNb1heE6— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) September 11, 2025
एक वाजताच्या सुमारास पक्षाने सांगितले की संजय सिंह थोड्याच वेळात मेहराज मलिक यांच्या अटकेबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. दिल्लीतील आप आमदार इम्रान हुसेन यांनाही संजय यांच्यासह नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
हुकूमशाही शिगेला पोहोचली Sanjay Singh under house arrest।
संजय सिंह यांनी, “हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे, मी सध्या श्रीनगरमध्ये आहे. लोकशाहीमध्ये, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि निषेध करणे हा आपला संवैधानिक अधिकार आहे. आज श्रीनगरमध्ये मेहराज मलिक यांच्या बेकायदेशीर अटकेविरोधात पत्रकार परिषद आणि निषेध करण्यात आला, परंतु सरकारी अतिथीगृह पोलिस छावणीत बदलण्यात आले आहे. मला, इम्रान हुसेन आणि माझ्या सहकाऱ्यांना अतिथीगृहातून बाहेर पडण्याची परवानगी नाही.” असे म्हटले आहे.
आपच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे अध्यक्ष मलिक यांना सोमवारी (८ सप्टेंबर) डोडा जिल्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याच्या आरोपाखाली कडक पीएसए कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांना कठुआ जिल्हा तुरुंगात पाठवण्यात आले.





