Sanjay Singh on Raghav Chadha: संजय सिंह यांचा आता राघव चड्ढाच्या व्हिडिओवर पलटवार ; म्हणाले, “मला अत्यंत खेदाने सांगावं लागतंय …”
Sanjay Singh on Raghav Chadha:

Sanjay Singh on Raghav Chadha: दिल्लीच्या राजकारणात आम आदमी पार्टी आणि राघव चड्ढा यांच्यातील वाद जोर धरत आहे. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्यासोबतच, पक्षाने त्यांना सभागृहात बोलण्यास बंदी घालण्याचाही निर्णय घेतला आहे. आपण असे काय चुकीचे केले आहे की पक्ष आपल्यावर अशी कारवाई करत आहे,?असा प्रश्न चड्ढा आता सातत्याने विचारत आहेत.
दरम्यान, राघव चड्ढा यांनी प्रश्नांचा भडीमार करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर आता संजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दावा केला आहे की, चड्ढा अनेक बाबतीत पक्षाच्या भूमिकेपासून विचलित होतात.असे म्हणत त्यांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केला.
सिंह यांचे चड्डा यांच्यावर आरोप Sanjay Singh on Raghav Chadha:
पुढे बोलताना ते म्हणाले, “राघवचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यासंदर्भात मला हे सांगायचे आहे की, आम्ही अरविंद केजरीवाल यांचे खरे सैनिक आहोत आणि आम्ही त्यांच्याकडून एकच गोष्ट शिकलो आहोत: निर्भयपणे, धैर्याने आणि शौर्याने लढायचे आणि संघर्ष करायचा. पण जेव्हा मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधात एखादा प्रस्ताव येतो, तेव्हा तुम्ही त्यावर सही करत नाही.
पश्चिम बंगालमध्ये लोकांचे मतदानाचे हक्क काढून घेतले जात आहेत. दिल्लीत आम्ही पाहिले की निवडणूक आयोगाचा कसा गैरवापर केला गेला. पंजाबचा मुद्दा आला तरी तुम्ही गप्प राहता आणि बोलत नाही. तुम्ही पंतप्रधान मोदींच्या विरोधात आवाज उठवत नाही.” ‘राघव चड्ढा जनहिताच्या अनेक मुद्द्यांवर गप्प राहतात’ असेही त्यांनी म्हटले आहे.
इतकेच नाही तर, संजय सिंह पुढे म्हणाले, “मला अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की, तुम्ही (राघव चड्ढा) देशाच्या, जनहिताच्या आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर बोलत नाही. गुजरातमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण होते, पण तुम्ही त्यावर बोलत नाही. केंद्रातील मोदी सरकार पंजाबचे सर्व हक्क हिसकावून घेण्याचे काम करत आहे, पण तुम्ही त्यावरही आवाज उठवत नाही.”
‘ वॉकऊतच्या बाबतीत राघव चड्ढा मागे’ Sanjay Singh on Raghav Chadha:
संजय सिंह यांनी प्रश्नार्थक स्वरात राघव चड्ढा यांना टोला लगावत म्हटले, “असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर सभात्याग करणे आवश्यक आहे, पण राघव चड्ढा सभात्यागसुद्धा करत नाहीत. या सर्व गोष्टींसाठी देशाला तुमच्याकडून उत्तरे हवी आहेत, जनतेला तुमच्याकडून उत्तरे हवी आहेत. जय हिंद.”


