Operation Sindoor | ऑपरेशन सिंदूर’वर संजय राऊतांची दोनच शब्दात प्रतिक्रिया

Operation Sindoor | पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. बुधवारी (७ मे) रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे 15 दिवसांनंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून हा बदला घेतला आहे. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकद्वारे केलेला सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. आता यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
संजय राऊत प्रतिक्रिया काय?
नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दोनच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. जय हिंद! असं संजय राऊतांनी म्हटले आहे. त्यासोबतच राहुल गांधी यांनीही ट्वीट करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मला आपल्या सैन्य दलाचा अभिमान आहे. जय हिंद; असं राहुल गांधींनी म्हटले आहे.
शरद पवारांची पोस्ट काय?
शरद पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.’ Sharad Pawar |
ढे त्यांनी भारतीय जवानांचे कौतुक करत लिहिले की, ‘या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद.’ यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय पटलावर भारत आक्रमक असल्याचे टाळले असल्याचेही म्हंटले आहे. Sharad Pawar |





