Sanjay Raut : संजय राऊतांची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. राऊत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं आहे. सध्या राऊत यांच्यावर आवश्यक वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार केले जात आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत हे रूटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले असून, आजच्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर ते भांडूप येथील मैत्री निवास्थानी’ विश्रांती घेण्यासाठी परतणार आहेत.
संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि माध्यमांपासून दूर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक पत्रक जारी करत आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. त्या पत्रकात त्यांनी म्हटलं होतं की,
“माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याचे निदर्शनास आले आहे. उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन.”
दरम्यान, ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते म्हणून सक्रिय असलेले संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थकांकडून काळजी व्यक्त केली जात आहे.





