संजय राऊत यांना धमकी देणाऱ्यास पश्चिम बंगालमधून अटक
Updated On:

कोलकाता – शिवसेना आणि कंगना प्रकरणी मुंबई पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमधून एकाला अटक केली आहे. पलाश घोष असे या युवकाचे नाव असून तो केवळ 20 वर्षीय आहे. टॉलीगंज भागात तो राहतो.
त्याला आज पहाटे तेथे कोलकाता पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. त्याने खासदार राऊत यांना गंभीर परिणामांची धमकी दिली होती.
अभिनेत्री कंगना हिचे आपण फॅन असल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिली होती. त्याला आता कोलकाता न्यायालयातून ट्रांझिट रिमांड घेऊन चौकशीसाठी मुंबईला नेले आहे.
संजय राऊत आणि कंगना राणावत यांच्यात मोठाच वाद रंगला आहे. त्या प्रकरणात कंगनाची बाजू घेऊन पलाश घोष याने थेट संजय राऊत यांनाच धमकी दिली होती.





