Sanjay Raut Comeback | ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिने माध्यमांपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला. विविध मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणारे संजय राऊत मागील काही दिवस माध्यमे, राजकीय बैठकांपासूनदूर राहिले. मात्र तरीही ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून सरकारच्या धोरणावर कठोर शब्दात त्यांचं टीकास्त्र सुरूच होतं. एवढंच नाही तर आजारीपणातही त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली. आता पुढील आठवड्यापासून संजय राऊत यांची तोफ धडाधडणार असल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत हे पुढील आठवड्यात सोमवारी, सकाळी १० वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी राऊतांची घेतली भेट आक्रमक भाषेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत ठाकरे गटाची भूमिका जाहीर करतात. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. काही दिवसांवर महापालिका निवडणुका आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात होत असलेले आरोप-प्रत्यारोप, महायुतीमधील असंतोष, ठाकरे गट-मनसे यांची संभाव्य युती, मतदार यादीतील घोळ असे अनेक मुद्दे मागील काही दिवसांत चांगलेच चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत संजय राऊत पुन्हा एकदा अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसणार आहेत. हेही वाचा: “काँग्रेसमध्ये काही शिल्लक राहिलेले नाही…”; विजय वडेट्टीवारांना थेट धनुष्यबाण हाती घेण्याची ऑफर