मुंबई : ठाकरेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेते संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांच्यासह राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी भेट दिली. राजकारणात शिवसेने (उबाठा)ची बाजू आक्रमकपण मांडणारे आणि विरोधकांना घायाळ करणारे राज्यसभा खासदार राऊत हे सध्या आजारपणामुळे सक्तीच्या रजेवर आहेत. संजय राऊत यांना दुर्धर आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. राऊत यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे म्हणाले, मी रोज सुनील राऊत यांना संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी फोन करत असतो. खूप दिवसांपासून त्यांना भेटायचे होते, आज भेट झाली, चांगले वाटले. आज संजय राऊत खूप फ्रेश दिसले. संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील. नुसते दिसणार नाहीत तर तलवार घेऊन मैदानात दिसतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर न पडण्याची ताकीद दिली होती. मात्र, 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला संजय राऊत हे बंधन झुगारुन घराबाहेर पडले होते. त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला होता. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि लाडक्या साहेबांचे दर्शन घेतले होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी भेट दिली. राऊत यांच्या खालावलेल्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते मिलिंद नार्वेकर यांच्यासह पोहोचले होते. प्रकृती अस्वस्थ असतानाही संजय राऊत हे पूर्णपणे निष्क्रिय नाहीत. ते नियमितपणे सामना वृत्तपत्रासाठी संपादकीय लिखाण करत आहेत आणि रोक-ठोक सदरातून त्यांचे विचार मांडत आहेत. तसेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की ट्विटर आणि फेसबुकचा वापर करून ते राजकीय भूमिका व्यक्त करत आहेत. त्यामुळे थेट पत्रकार परिषदांमध्ये अनुपस्थित असले तरी, त्यांची राजकीय सक्रियता कायम आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या मी संजय राऊतांना फोन करत नाही. त्यामुळे सुनील राऊत यांना राऊतांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करण्यासाठी छळत असतो. खूप दिवसापासून भेटायचं होतं आज भेट झाली. संजय राऊत आज खूप फ्रेश दिसले. पुन्हा एकदा लवकरच संजय राऊत तलवार घेऊन मैदानात दिसतील असं विधानही उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या भेटीनंतर केलं.