Sanjay Raut: मार्च-एप्रिल महिन्यांपर्यंत मोदी सरकार पडेल- खासदार संजय राऊत
Sanjay Raut:

पर्यायी सरकार स्थापन होईल अशी परिस्थिती
Sanjay Raut: देशात ज्या पद्धतीचे सध्याचे वातावरण आहे. तरुण रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्या विरोधात पोलीस आणि सरकार ब्रिटिशांप्रमाणे अन्याय करीत आहेत. हे पाहता देशातील मोदी सरकार मार्च-एप्रिलपर्यंत अखेरचा श्वास घेईल. त्यांचे सरकार पडण्याच्या हालचाली सुरू असल्याचा माझा अंदाज आहे.
पर्यायी सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार राऊत म्हणाले की, देशात व्यापाऱ्यांचे सरकार आहे. ५६ इंच छातीचे सरकार म्हणतात आणि आंदोलनाकर्त्यांना सामोरे जाण्याची हिंमत दाखवत नाहीत. दिल्लीत जम्मू-काश्मीरसारखी अवस्था आहे. मात्र, ते जनतेचे बंड थांबवू शकणार नाहीत.
आंदोलन करणाऱ्यांना झुरळ, माशी, मच्छर संबोधले जाण्याची कसली मानसिकता आहे. तरुणांना अतिरेकी ठरवले जात आहे. पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर आदेश पाळू नयेत.
ज्यांनी स्वातंत्र्याचा लढा अनुभवला नाही त्यांनी सरकार घालवण्याच्या लढाईत सामील व्हावे, असे आवाहन राऊत यांनी केले. सीजेपीच्या मुलांवर ब्रिटिशांप्रमाणे अन्याय राज्य करीत आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चुकीच्या पद्धतीने सत्तेत येणेच हाच मतचोरीचा पुरावा असल्याची टिका राऊत यांनी केली. सध्या दिल्लीत साडेचार लाख पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. नरेंद्र मोदी यांनी अघोषित आणीबाणी लागू केल्याचे राऊत म्हणाले.
खासदार राऊत म्हणाले की, जनतेचे बंड पाहता सहा महिन्यांत सरकार बदलेल असे चित्र आहे. राज्यात पेपरफुटीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत, यात गुन्हा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणीमध्ये होतो असे सांगतात.
त्यांच्या काळात विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणे योग्य नाही. हे सरकार लोकांच्या मनातील नसून ते निर्दयी आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या निकालावर बोलताना राऊत म्हणाले की, निकाल लागेल तेव्हा चोरीला गेलेला मुद्देमाल परत केला जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.





