झिशान सिद्दिकींच्या जबाबावर संजय राऊत म्हणाले,”तुम्ही ज्यांची नाव घेत आहेत…”

Sanjay Raut on Zeeshan Siddiqui । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान हत्या प्रकरणाची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 26 जणांना अटक केली आहे. मात्र बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. झिशान सिद्दीकी यांनी या प्रकरणात आणखी काही नेत्यांच्या नावांचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
त्या विषयाशी माझा तसाही कोणता संबंध नाही Sanjay Raut on Zeeshan Siddiqui
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणांमध्ये त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्याकडून जबाब नोंदवला गेला आहे, त्यामध्ये ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यासह मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, या प्रकरणाची माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. त्या विषयाशी माझा तसाही कोणता संबंध नाही. झिशान सिद्दीकी यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे, आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे आणि पोलिसांची काय भूमिका आहे, हे पहावे लागेल. मला माहित नाही. मला त्या प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्यांची नाव घेताय त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय त्यावरती मी कोणताही मत व्यक्त करणार नाही,” असे म्हणत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
झिशान सिद्दीकींच्या जबाबात नेमकं काय?
झिशान सिद्दीकी यांनी आपल्या पोलीस जबाबात, मी वांद्रे पूर्व मतदारसंघातील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या लोकांविरुद्ध सतत आवाज उठवत होतो आणि निषेध करत होतो. मी स्थानिक आमदार होतो, त्यामुळे नागरिकांचा मुद्दा मी मांडत होतो. या काळात, माझा कोणताही दोष नसतानाही खेरवाडी पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणाच्या विकास आराखड्याचे सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी महासभेच्या ठरावासाठी तेथे राहणाऱ्या लोकांची बैठक बोलावली. त्यावेळी ते म्हणाले की, जर तुमचा माझ्यावर (अनिल परब) विश्वास असेल तर मी कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला आणीन, तुम्ही त्याला मान्यता द्या…त्यानंतर, मी (झीशान सिद्दीकी) पुन्हा तिथे राहणाऱ्या लोकांसोबत बैठक घेतली आणि त्यांना सांगितले की तुम्ही कोणताही बिल्डर निवडू शकता पण बिल्डर निवडण्यापूर्वी कागदपत्रे वाचा आणि कोणत्याही दबावाशिवाय त्यावर सही करा. यानंतर, पृथ्वी चव्हाण नावाच्या एका विकासकाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला आश्वासन दिले की काळजी करू नका आणि आम्ही त्याच ठिकाणी राहणाऱ्या लोकांना घरांच्या बदल्यात घरे देऊ…यानंतर मी महासभेच्या ठराव बैठकीतही भाग घेतला, असं झिशान सिद्दीकी म्हणाले.
झिशान सिद्दीकी यांचे स्टेटमेंट तोडून वापरले Sanjay Raut on Zeeshan Siddiqui ।
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणांमध्ये मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर आता त्यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते बोलताना म्हणाले, आज एक बातमी आली आहे. झिशान सिद्दीकी यांचे स्टेटमेंट तोडून वापरले जात आहे. माझे यात नाव नाही, झिशान सिद्दीकींनी बाबा सिद्दीकी यांची जी घटना झाली, त्यादिवशी बाबा सिद्दीकी यांचे माझ्याशी बोलणे झाले होते अशी माहिती दिली आहे, त्यांचे वाक्य तोडून वापरले जात आहे. बाबा सिद्दीकी आणि मी वारंवर बोलत असायचो. जी घटना झाली ते माझ्यासाठी धक्कादायक होती. मी आणि ते वांद्र्याचे रहिवाशी असल्याने बोलायचो. तसेच आम्ही एनडीएचे घटक असल्याने राजकीय मुद्द्यांवर ही चर्चा व्हायच्या. मी सांगू इच्छितो की, बाबा सिद्दीकी यांच्यासोबत जी घटना घडली, ते बाहेर यायला हवे. तसेच कारवाई झालीच पाहिजे, मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.





