“अमरावतीत कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं” ; संजय राऊतांची शंका

Sanjay Raut on EVM । राज्यात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज आठ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत अटीतटीची लढत होत आहे. प्रकाश आंबेडकर, नवनीत राणा, प्रतापराव जाधव, संजय जाधव, प्रतापराव चिखलीकर आदी उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. विदर्भातील पाचपैकी वर्धा, यवतमाळ-वाशीममध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत आहे. तर अकोला, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. दरम्यान, वर्ध्यामध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आलीय. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
आम्ही ३५ प्लस टार्गेट हा आकडा ठेवला Sanjay Raut on EVM ।
ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे समोर आल्यानंतर त्यावर बोलताना संजय राऊत यांनी शंका व्यक्त केली. याविषयी बोलताना, “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि आमच्या समोर चोरलेली शिवेसना असा सामना आहे. या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. आठ जागांवर भाजपाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फार संघर्ष करावा लागत आहे. मी आपल्याला वारंवार सांगतोय, प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुका जिंकतील. किंबहुना तेच जिंकतील असं वातावरण आहे. आम्ही ३५ प्लस टार्गेट हा आकडा ठेवला आहे, आम्ही तेवढ्या जागा जिंकू. या आठही जागांवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमरावतीत कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं Sanjay Raut on EVM ।
पुढे त्यांनी अमरावती आणि वर्ध्यातील इव्हीएमबाब बोलताना, “अमरावतीत कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं. वर्ध्यात भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे अमरावती आणि वर्ध्यात जाऊन आले. ईव्हीएम बंद पडणे आणि मतदारांना खोळंबायला लावणे आणि मग मतदारांनी मतदानाला पाठ फिरवणे हा षडयंत्राचा भाग आहे. अचानक संध्याकाळी मग मशिन चालू होतात ज्यांना हव्या त्यांच्या झुंडी उभ्या राहतात. पण सकाळी मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना नाउमेद करून त्यांना परत पाठवणे हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र आहे.”असा आरोप त्यांनी यावेळी केला.





