अनिल देशमुखांवरील हल्ल्याबाबत संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप ; म्हणाले,”हा हल्ला…”

Sanjay Raut on Devendra Fadnavis । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांकडून काल रात्री हल्ला करण्यात आला . हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीतच देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आता त्यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या हल्ल्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावरSanjay Raut on Devendra Fadnavis ।
संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत बोलताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था संपुष्टात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात माजी गृहराज्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगानंतर या हल्ल्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
स्टंटबाजीची आम्हाला गरज नाही स्टंटबाजी मोदी करतात Sanjay Raut on Devendra Fadnavis ।
पुढे बोलताना संजय राऊत यांनी, “स्टंटबाजीची आम्हाला गरज नाही स्टंटबाजी मोदी करतात, देशमुखांवरील हल्ल्याला मिंधे सरकार आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राज ठाकरेंबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्यावर शिवसेना सोडण्याची वेळ आली आहे, कधी ते भाजपची स्क्रिप्ट वाचतात, कधी शिंदे यांची स्क्रिप्ट वाचतात. आज संध्याकाळपर्यंत जिहाद वगैरे संपेल. भाजपला दंगल घडवायची आहे, पण दंगल होणार नाही.असेही त्यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा
तुमच्याकडे मतदानासाठी Voter ID नाही? आता १२ पैकी कोणत्याही एका पुराव्याद्वारे करता येईल मतदान





