मुंबई : अंधश्रद्धेविरुद्ध महाराष्ट्राने कायम लढा दिला. फार मोठी परंपरा असून महाराष्ट्राने धर्मांधतेविरूद्धही लढा दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मंत्र्यांचे पीए जसे ते तपासून घेतात तसे त्यांनी मंत्री देखील तपासून घेतले पाहिजेत. आघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचा काय भलं करणार आहेत? आघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर राज्याच्या मुख्यमंत्र्याना एलिमिनेट करून तिथे आपला नेता यासाठी आघोरी विद्येचे प्रकार शिंदेसेनेचे लोक ठिकठिकाणी करत आहेत, हे वारंवार मी सांगितले आहे. यांना जनतेच्या कल्याणाचे, लोकशाहीचे, विचारांचे काहीही पडलेले नाही, अशी टीका उद्धवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केली. राज्याच्या मंत्रिमंडळातील शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भरत गोगावले यांचा आघोरी पूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी गोगावले यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल केलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करणे, तसा शिंदेसेनेच्या गटाच्या मंत्र्यांना या आघाडी उपक्रमाद्वारे भाजपाच्या प्रमुख नेत्यांना एलिमिनेट करायचे आहे. व्हिडिओ समोर आले आहेत… हे सगळ त्यासाठीच सुरू आहे आणि वेगवेगळ्या भागात सुरू आहे. साताऱ्यापासून महाडपर्यंत, महाड पासून सावंतवाडी बेळगावपर्यंत प्रत्येक गोष्टींचे फोटो माझ्याकडे असल्याचा दावा संजय राऊतांनी यावेळी केला आहे.