Sanjay Raut : एलपीजीबाबत खोटे बोलू नका, जनतेला विश्वासात घ्या; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सल्ला
पश्चिम आशियातील युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत केंद्र सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप ठाकरेसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

Sanjay Raut : पश्चिम आशियातील युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत केंद्र सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप ठाकरेसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
तसेच, या मुद्द्यावर सरकारने जनतेला विश्वासात घेतले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. माध्यमांशी बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
इंधनाच्या तुटवड्यामुळे पाकिस्तान आणि इतर अनेक देशांमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारवर विश्वास ठेवू नका. ते खोटे बोलत आहेत. एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि तो असाच कायम राहील.
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता दुसरा महिना सुरू झाला असून, या युद्धामुळे खुद्द सरकारही एलपीजीच्या उपलब्धतेबाबत काहीही करू शकत नाही. पण आमचा एकमेव मुद्दा हाच आहे की, सरकारने खोटे बोलू नये आणि जनतेला विश्वासात घ्यावे, असा आग्रह त्यांनी धरला.
२८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यांमुळे भडकलेल्या पश्चिम आशियातील युद्धाने जागतिक ऊर्जा पुरवठा (Sanjay Raut) साखळी विस्कळीत केली आहे. भारताच्या ऊर्जेच्या गरजांचा विशेषतः तेल आणि वायूचा मोठा हिस्सा आखाती देशांकडून पूर्ण केला जातो.






