‘सात पोलीस अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडून मी इथपर्यंत…” ; योगी सरकारच्या ‘या’ मंत्र्याचे वादग्रस्त विधान

Sanjay Nishad । उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आणि निषाद पक्षाचे प्रमुख संजय निषाद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो स्टेजवरून वादग्रस्त विधाने करताना दिसत आहे. पोलिसांकडे बोट दाखवत संजय निषाद यांनी,”मी इथे असाच पोहोचलो नाही, सात निरीक्षकांचे हातपाय तोडून खड्ड्यात टाकल्यानंतर मी इथपर्यंत आलोय” असे वादग्रस्त केले आहे.
अनेक पोलिस निरीक्षकांचे हातपाय तोडून मी इथे पोहोचलो Sanjay Nishad ।
सुलतानपूरला पोहोचलेले मंत्री संजय निषाद यांनी पोलिसांवर आरोप केला आहे. त्यांनी “हे आरोप करताना त्यांच्या समुदायातील अनेक लोकांना बनावट प्रकरणांमध्ये अडकवण्यात आले आहे” असे म्हटले आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की,”आमच्या मुलांवरील सर्व खोटे खटले काढून टाका, अन्यथा तुमचा निषेध करण्यात येतील, निरीक्षकाला निलंबित केले जाईल, मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेन. मी इथे असाच पोहोचलो नाहीये, अनेक पोलिस निरीक्षकांचे हातपाय तोडून मी इथे पोहोचलो आहे. असे धक्कादायक विधान केले आहे.
मंत्री पुढे बोलताना, “जर कोणत्याही निषादला बनावट प्रकरणात अडकवले गेले तर आम्ही ते सहन करणार नाही. जर इन्स्पेक्टरने जास्त नाटक केले तर तो तुरुंगात जाईल आणि त्याला जामीनही मिळणार नाही. गरज पडल्यास, आम्ही निरीक्षकाविरुद्ध अधिक कठोर कारवाई करू.” असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. डॉ. संजय निषाद त्यांच्या निषाद पक्षाच्या जनाधिकार यात्रेसह सुलतानपूरला पोहोचले. ज्याठिकाणी त्यांनी प्रतापगड-सुलतानपूर सीमेवर असलेल्या चांदा परिसरातील मदारदीह गावात एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केले.
होईलच दिवशी दोन समाजात वाद Sanjay Nishad ।
१४ मार्च रोजी होळीच्या दिवशी जिल्ह्यातील दोस्तपूर पोलीस स्टेशन परिसरातील शाहपूर गावात होळी खेळताना दलित आणि निषाद कुटुंबात वाद झाला. वाद इतका वाढला की हाणामारी झाली, ज्यामध्ये जखमी झालेल्या ६५ वर्षीय दलित महिलेचा, सुनारा देवी यांचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शाहपूर गावप्रमुख कृष्ण कुमार निषाद यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि गावप्रमुखासह ४ जणांना अटक करून तुरुंगात पाठवले.
निषाद पक्षाचे प्रमुख आणि कॅबिनेट मंत्री संजय निषाद यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी स्टेजवरून पोलिस सीओ आणि इतर अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि सांगितले की निषाद समाजाच्या लोकांना या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे. तो निर्दोष आहे. त्यामुळे त्यांना सोडण्यात यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.





