Satara: जिल्हा परिषद बांधकाम उत्तरच्या कार्यकारी अभियंतापदी संजय खोत
Satara बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता अमर नलवडे यांची मिरजच्या सार्वजनिक बांधकाम विभागात बदली झाली आहे.
Updated On:

Satara: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुणे येथून संजय खोत यांची नियुक्ती झाली आहे. बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता अमर नलवडे यांची मिरजच्या सार्वजनिक बांधकाम विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुणे येथील विद्याधर शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. श्री. खोत यांनी यापूर्वी उपअभियंता म्हणून सातारा जिल्ह्यात काम केले आहे. तर विद्याधर शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीत उपअभियंता म्हणून काम केले आहे.





