कॅन्सर उपचारादरम्यानचा संजय दत्तचा फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा सध्या लंग कॅन्सरची झुंज देत आहे. त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी तो आपली पत्नी मान्यता दत्त आणि दोन मुलांना भेटण्यासाठी दुबईला गेला होता. दुबईत आपल्या कुटुंबीयांना काही काळ घालविल्यानंतर तो नुकताच मुंबईला परतला आहे.
संजय दत्तवर दोन कीमोथेरेपी करण्यात आल्या आहेत आणि आता कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याच्यावर तिसरी कीमोथेरेपी करण्यात येणार आहे. याच दरम्यानचा संजय दत्तचा एक फोटो समोर आला असून हा फोटो पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.
या फोटोत संजय दत्त रुग्णालयातील एका चाहत्यासोबत फोटो क्लिक करताना दिसतो. यात संजय दत्तची तब्येत दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसून येत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास संजय दत्त अनेक चित्रपटांत झळकणार आहेत. यात शमशेरा, केजीएफ चॅप्टर-2, पृथ्वीराज, भुज ः द प्राइड ऑफ इंडिया आणि तोरबाज आदी चित्रपटांचा समावेश आहे. यातील काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले आहेत, तर काही चित्रपटाचे थोडेफार काम बाकी आहे.





