Sanjay Dutt : संजय दत्तने दिल्या सन अॅाफ सरदार २ चित्रपटाला शुभेच्छा; भावना व्यक्त करत म्हणाला…

Sanjay Dutt : अभिनेता अजय देवगण याची मुख्य भूमिका असलेला सन अॅाफ सरदार २ या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, या चित्रपटातील काही कलाकार बदलण्यात आले आहेत. यामध्ये सन अॅाफ सरदारच्या पहिल्या भागात असलेला अभिनेता संजय दत्त हा नससणार आह.
यामुळे आता संजय दत्तने एक पोस्ट शेअर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये त्याच्या मनातील भावना लिहिल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ‘सन ऑफ सरदार २’ चा दुसरा ट्रेलर शेअर करताना संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘सन ऑफ सरदार २ साठी राजूचे अभिनंदन, जर आपण ते एकत्र केले असते तर ते अधिक मजेदार झाले असते.’ संजय दत्तच्या या पोस्टवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत.
एका युजरने लिहिले आहे की ‘बाबा, तुम्ही तिसऱ्या भागात असायला हवे होते.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की ‘बाबा यात असायला हवे होते.’ “मला तुम्ही आवडता बाबा.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की ‘आता तुम्ही खलनायकाच्या भूमिकेत दिसाल.’ सन अॅाफ सरदार २ या चित्रपटाची रिलीज डेट सैयारा या चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता पुढे ढकलण्यात आली होती. आता १ अॅागस्ट २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.





