संजय दत्तने रणबीर – आलियाला दिला लग्नाबाबत हा सल्ला

मुंबई – अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. आता सोशलवर त्यांच्या लग्नाच्या चर्चाही होताता दिसून येत आहेत. दोघांचेही चाहते लग्न कथी करणार आहे? अशी सोशल मिडियावर विचारणा करत आहेत.
यातच आता ही लोकप्रिय जोडी याच महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आलिया – रणबीरचे लग्न मुंबईत पार पडणार आहे. रणबीरने स्वतः लग्नाचे ठिकाण, त्याचे वडिलोपार्जित घर ‘आरके हाऊस’ निश्चित केले आहे.
रणबीर आई-वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा विवाह 20 जानेवारी 1980 रोजी आरके हाऊसमध्ये झाला होता. त्यामुळे रणबीरलाही त्याची प्रेयसी आलियासोबत चेंबूर येथील घरात लग्न करायचे आहे. या लग्नात 450 पाहुणे सहभागी होणार आहेत. 17 एप्रिलला लग्नाची तारीख निश्चित झाली आहे.
सध्या सोशलवर या घरामध्ये लग्नाची तयारी सुरु असणारे विडिओ चांगलेच व्हायरल होत असून या बाबत बॉलीवूड सेलेब्सना सुद्धा विचारण्यात येत आहे. यातच अभिनेता संजय दत्त याला पापाराजीने या लग्नाबाबत प्रश्न विचारला,’रणबीर खरंच लग्न करतोय का? यावर तो म्हणाला की, ‘जर ते दोघे खरोखर लग्न करत असेल तर मी त्यांच्यासाठी खरोखर आनंदी आहे.
संजय पुढे म्हणाला, “लग्न ही एक वचनबद्धता आहे जी ते दोघे एकमेकांशी करत आहेत. आणि त्यांनी त्यावर टिकून राहून, एकमेकांचा हात धरून आनंद, शांती आणि वैभवाने पुढे जावे लागेल.’असं म्हणत त्याने रणबीर – आलियाला लग्नाबाबत सल्ला दिला आहे.
दरम्यान, रणबीरच्या आलियाच्या लग्नाला करण जोहर, शाहरुख खान, आदित्य रॉय कपूर, विक्की कौशल-कॅटरीना कैफ, रणवीर सिंह-दीपिका पदुकोण यांच्यासह बॉलिवूडमधले बडे सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत.





