संजय भन्साळीचा जबाब नोंदवणार
Updated On:

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात निर्माता दिग्दर्शक संजय लिला भन्साळी याचाही जबाब नोंदवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांच्या तपास पथकाने घेतला असून त्या अनुषंगाने त्याला नोटीस धाडण्यात आली आहे. येत्या 6 जुलै रोजी त्याला त्यासाठी पाचारण करण्यात येणार आहे. या प्रकरणात भन्साळी यांचा नेमका काय संबंध आहे हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळी माहिती पुढे येत असून त्या अनुषंगाने पोलिसांनी प्रत्येकाचीच झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, त्याच्यावर त्यासाठी नेमका कोणी दबाव आणला होता ही बाब मात्र अजून गुलदस्त्यातच राहिली आहे. या प्रकरणात चित्रपटसृष्टीतील अनेकांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत.





