Pimpri : सांगवीत महेश मंडळातर्फे समाजउत्पत्ती दिन उत्साहात

पिंपरी : सांगवी परिसरातील महेश मंडळातर्फे समाजउत्पत्ती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले होते. या कार्यक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे उत्स्फूर्त सहभागाने रंगतदार सादरीकरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंडळाचे संस्थापक सतीश लोहिया, अध्यक्ष सत्यनारायण बांगड, माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनावने, निलेश अट्टल आणि मुकुंद तापडिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
या वेळी चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस, एकल, युगल आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बाल स्पर्धकांनी विविध महान व्यक्तिमत्वांच्या वेशभूषा सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. महिलांच्या “हिंदू देवी-देवतांचे महत्त्व” या विषयावरील समूहनृत्याने उपस्थितांमध्ये अध्यात्मिक आणि सांस्कृतिक जाणीव जागवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिम्पल हेडा आणि मनोज अटल यांनी केले. विक्रांत देव्हारे आणि संजय झंवर यांनी परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक झंवर, हेमंत पलोड, गणेश चरखा, दीपेश मालानी, पंकज टावरी आणि शुभम बिर्ला यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाने सांस्कृतिक एकतेचा आणि समाजप्रबोधनाचा उत्तम संदेश दिला.





