पुणे जिल्हा | खेड-आळंदीत सांगली पॅटर्न राबविणार

चाकण, (वार्ताहर) – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीला सोडण्यात यावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने विशाल पाटील तयार झाले त्यापद्धतीने खेड-आळंदी विधानसभा मतदासंघात विशाल पाटील तयार होतील म्हणजेच सांगली पॅटर्न राबवला जाईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
खेड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने चाकण येथे रविवारी (दि. 28) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सांगलीची पुनरावृत्ती काँग्रेस खेडमध्ये करणार असल्याचा ठरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे सचिव अमोल दौंडकर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जमिरभाई काझी, पुणे जिल्हा लीगल सेलचे अध्यक्षा जयाताई मोरे, पुणे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतिश मांजरे,
खेड तालुका युवक अध्यक्ष गणेश सहाणे, चाकण शहर अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, पुणे जिल्हा काँग्रेसचे सदस्य सुनील मिंडे, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष पवार, खेड तालुका युवक काँग्रेसचे सचिव धनेश म्हसे पाटील, आळंदी शहर अध्यक्ष उमेश रानवडे, चाकण शहर युवक अध्यक्ष मयूर आगरकर, कावेरी गुंजाळ, रामदास राळे, रमेश नेहरे उपस्थित होते.





