Sangli News : नशेच्या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या दोघांना आष्टा येथून अटक
नशेसाठी वापरणाऱ्या ट्रेमिमाईड या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सांगलीच्या (Sangli News) आष्टा येथून अटक केली.

Sangli News : नशेसाठी वापरणाऱ्या ट्रेमिमाईड या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सांगलीच्या (Sangli News) आष्टा येथून अटक केली.
त्यांच्याकडून ट्रेमिमाईड इंजेक्शनच्या 74 बाटल्या व दुचाकी असा एक लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रेमिमाईड या इंजेक्शनचा नशेसाठी (Sangli News) वापर करण्यात येतो.
यासाठी दोघे आष्टामध्ये इंजेक्शन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून अभिषेक भीमराव सरवदे आणि रेहान रफिक मुजावर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दोघांनी ट्रेमिमाईड इंजेक्शन इंडिया मार्ट या ॲप्लिकेशन वरून ऑनलाइन मागवल्याची (Sangli News) कबुली दिली आहे. याबाबत पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.





