Sangli News : वारणा नदीत बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू
शिराळा तालुक्यातील मांगले येथे वारणा नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा (Sangli News) बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. 23) दुपारी घडली.

Sangli News : शिराळा तालुक्यातील मांगले येथे वारणा नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा (Sangli News) बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. 23) दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश भीमराव खामकर (वय 35, रा. मांगले, ता. शिराळा, जि. सांगली) हे काखे मांगले पुलाखालील वारणा नदीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
घटनेनंतर (Sangli News) त्यांचे भाऊ रितेश खामकर यांनी त्यांना तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांनी तपासून पाहिले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात (Sangli News) अकस्मात मयत नं. 21/2026, बी.एन.एस.एस. कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. हवालदार भूषण महाडिक तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






