Sangli News : धक्कादायक! वटपौर्णिमेच्या दिवशीच नवविवाहितेने नवऱ्याचा घेतला जीव; सांगलीमधील घटना

सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका नवविवाहितेने वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीचा जीव घेतला. धक्कादायक म्हणजे या विवाहितेच्या लग्नाला अवघे 17 दिवस झाले होते. ही घटना सांगलीच्या कुपवाड या ठिकाणी घडली आहे. इंदौरच्या राजा रघुवंशीच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना हि घटना समोर आल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अनिल तानाजी लोखंडे (वय 50) असे मृत पतीचे नाव आहे. कुपवाड शहरातल्या एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. तर राधिका लोखंडे – इंगळे असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वीच राधिकाचे अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. याच भांडणाचा राग राधिकाच्या मनात होता. यातूनच राधिकाने वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुपवाडचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.यानंतर त्यांनी संशयित पत्नी राधिका हिला अटक केली. अनिल लोखंडे यांच्या खुनाचं आणखी वेगळे काही कारण आहे का? याचा देखील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.





