Sangli News : खळबळजनक ! मिरजेत महापालिकेच्या प्रसूती गृहातील शौचालयात आढळले मृत नवजात अर्भक
मिरजेत महानगरपालिकेच्या प्रसूती गृहातील शौचालयात मृत अवस्थेत नवजात पुरुष जातीचे अर्भक आढळल्यामुळे मिरजेत (Sangli News) एकच खळबळ उडाली आहे.

Sangli News : मिरजेत महानगरपालिकेच्या प्रसूती गृहातील शौचालयात मृत अवस्थेत नवजात पुरुष जातीचे अर्भक आढळल्यामुळे मिरजेत (Sangli News) एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस (Sangli News) ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले, उपायुक्त स्मृती पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणत्या तरी अज्ञात महिलेने हे नवजात अर्भक टाकले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी प्रसूती गृहातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता शौचालयातून दुर्गंधी पसरल्याने ड्रेनेज लाईन तोंडली असल्याचा संशय व्यक्त करून ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी पाचारण करण्यात आले. शौचालयाची स्वच्छता करत असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत रात्री उशिरापर्यंत याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू होते. याठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली. या मृत अर्भकाला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह कर्मचारी व महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.






