Sangli News : मिरज शहर पोलिसांनी (Sangli News) दुचाकी चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत सराईत चोरट्याला अटक करत त्याच्याकडून तब्बल चोरीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ७५ हजार रुपये असल्याची माहिती मिरज शहर पोलिसांनी दिली. मिरज शहर पोलीस (Sangli News) ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेला सीसीटीव्ही फुटेज आधारे संशयिताची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अजय बाळासो पटकारे (वय ४२, रा. विचारे मळा, शाहू कॉलेजसमोर, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. मिरज शहर, विश्रामबाग, चिंचणी वांगी, कराड शहर तसेच कोल्हापूर परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली संशयिताने दिली. संशयिताकडून हिरो होंडा, होंडा शाईन, स्प्लेंडर, सीडी डॉन आदी कंपन्यांच्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. Sangli News पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, अंमलदार नीलेश कदम, राजेश गवळी, नितीन मोरे, झाकिरहुसेन काझी, श्रीकांत केंगार, स्वप्नील नायकोडे, मिलिंद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताविरुद्ध सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मिरज शहर पोलीस तपास करत आहेत.