Sangli News : सांगलीत बेकायदेशीर मेफेन टरमाईन इंजेक्शन विक्री करणाऱ्यास अटक
सांगली जिल्ह्यात (Sangli News) नशेखोरांना बेकायदेशीरपणे मेफेन टरमाईन औषधी द्रव्याची इंजेक्शन विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून ५६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Sangli News : सांगली जिल्ह्यात (Sangli News) नशेखोरांना बेकायदेशीरपणे मेफेन टरमाईन औषधी द्रव्याची इंजेक्शन विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून ५६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सांगली जिल्ह्यात (Sangli News) नशेखोरांना नशेचे पदार्थ विकणाऱ्या या व्यक्तीविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी एलसीबी शाखेस दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व पथकासह एक स्वतंत्र पथक तयार केले.
पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे फल्ले मंगल कार्यालयासमोर, सांगलीवाडी टोलनाका परिसरात निगराणी केली असता, एक जण हातात पिशवी घेऊन फल्ले मंगल कार्यालयाच्या मेनगेटपासून शिवशंभो चौकाकडे जाताना रोडवर थांबला. संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याबाबत विचारणा केली.
या राहुल सहदेव अडगळे (वय २३ ,रा. जोतीबा मंदिरामागे, समडोळी रोड, सांगलीवाडी, ता. मिरज, जि. सांगली) याच्या अंगझडतीत पिशवीमध्ये मेफेन टरमाईन औषधी द्रव्याच्या ८४ इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या. चौकशीत त्याने (Sangli News) सांगितले की, तो इंडिया मार्ट ॲप्लिकेशनवरून ऑनलाईन पद्धतीने गुगलवर सर्च करून कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने इंजेक्शन मागवतो आणि तरुण वर्गास नशेसाठी व उत्तेजक द्रव्य म्हणून जादा दराने विक्री करत असल्याची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील,पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार,पोलीस अंमलदार रणजित जाधव, अतुल माने, संकेत मगदुम, संदीप पाटील, सुशिल मस्के, अभिजित माळकर, संकेत कानडे, विनायक सनदी, ऋषिकेश सदामते, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी विजय पाटणकर, अजय पाटील, इझ्मान महालकरी, अभिजित पाटील यांनी ही कारवाई केली.






