Sangli News : खाकीला काळिमा ! कॉन्स्टेबलसह पोलीस पाटील एसीबीच्या जाळ्यात
चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी (Sangli News) केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम विहुल घोदे (वय ४०) आणि सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने (वय ३६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

Sangli News : चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी (Sangli News) केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम विहुल घोदे (वय ४०) आणि सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने (वय ३६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Sangli News) करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या भाऊ आणि पुतण्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर ही रक्कम एक लाख ६० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विक्रम घोदे यांनी तक्रारदाराला संबंधित रक्कम पोलीस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने दोघांविरोधात कारवाई करत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू असून या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.






