Sangli News : डिलीव्हरी कंपनीचे ऑफिस फोडणाऱ्या संशयिताकडून दीड लाखांची रक्कम जप्त
सांगली स्थानिक (Sangli News) गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत डिलीव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीचे ऑफीस फोडणाऱ्या संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १ लाख ५२ हजार ५०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.

Sangli News : सांगली स्थानिक (Sangli News) गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत डिलीव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीचे ऑफीस फोडणाऱ्या संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १ लाख ५२ हजार ५०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पोवार व पथकास संशयिताचा शोध घेण्याचे (Sangli News) निर्देश दिले. जत विभागात काल दि. १ रोजी पेट्रोलिंग करत असताना पिवळ्या शर्ट व काळ्या पॅन्टमधील एक संशयित व्यक्ती नागज फाटा परिसरात येणार आहे.असल्याची माहिती पोलीस पथकातील सोमनाथ गुंडे आणि अमर नरळे यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने नागज फाटा परिसरात सापळा रचला. तेथे आलेल्या वैभव बबन जाधव (वय २५, रा. ढोसेवाडी, मदने वस्ती, कटफळ, ता. बारामती) या संशयिताची चौकशी केली. पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार यांना त्याने डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीच्या ऑफिसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १ लाख ५२हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित वैभव जाधव याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित बबन सर्जेराव जाधव (रा. ढोसेवाडी, मदने वस्ती, कटफळ, ता. बारामती) याच्याविरोधात कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर, धाराशिव अशा विविध जिल्ह्यांमध्ये कुरिअर ऑफीस चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो सध्या फरारी असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली (Sangli News) पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार अमित परिट, अनिल ऐनापुरे, सोमनाथ गुंडे, अमोल ऐदाळे, अमर नरळे, आमसिध्द खोत, प्रकाश पाटील, श्रीधर बागडी, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, केरुबा चव्हाण, चालक गणेश शिंदे, विजय पाटणकर, करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे यांनी मिळून ही कारवाई केली.






