Sangli News : अंकली (ता. मिरज) येथे मंगळसूत्र चोरणार्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हैदरअली सरफराज कायम (वय 29, रा. इराणी इमाम वाडा, मुंब्रा, जि. ठाणे) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीतील 1 लाख 40 हजाराचे मंगळसूत्र, 80 हजाराची दुचाकी असा 2 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई व अंकलीमधील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Sangli News) मिरज तालुक्यातील अंकली येथील ज्योती वृषभ उपाध्ये या 5 मे रोजी सकाळी अंकली रेल्वे पुलाजवळ फिरण्यासाठी गेल्या असता दुचाकीवरून आलेल्या तिघां चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र चोरले होते. पोलिसांनी याचा तपास सुरू केला होता. (Sangli News) हाती मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून सराईत चोरट्यांच्या टोळीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी तपासासाठी एक पथक नियुक्त केले होते. (Sangli News) संबंधित पथक तपास करीत असताना नागपूर ते रत्नागिरी महामार्गावर इनामधामणी जवळ एक सराईत चोरटा येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून हैदरअली कायम याला अटक केली. (Sangli News) त्याने इम्रान इराणी (रा. गुंटकल, रा. आंध्रप्रदेश) आणि सादक इराणी (रा. गदग, रा. कर्नाटक) या दोघांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई आणि अंकली येथील दोन गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले आहेत. (Sangli News)