Pune News : धनकवडीत कार्यसिद्धी प्रतिष्ठानतर्फे ‘संगीत संध्या’ कार्यक्रम उत्साहात; ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वितरण

धनकवडी : समाजसेवा आणि सांस्कृतिक आनंदाचा दुहेरी संगम साधणाऱ्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानतर्फे नुकताच ‘दिवाळी फराळ, स्नेह मिलन व संगीत संध्या’ हा भव्य कार्यक्रम थोरवे हायस्कूल, चंद्रभागानगर, धनकवडी येथे अत्यंत उत्साहात पार पडला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गायिका सानिका कुलकर्णी यांचा ‘राग-रंग’ कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या सुरेल मैफलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि संगीताची एक अविस्मरणीय अनुभूती दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत १० व ११ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणे वाटली. यामध्ये काठी, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, स्टिक, वॉकर आदी ५५० पेक्षा अधिक वस्तूंचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक कल्याणासाठी आणि त्यांना स्वावलंबन मिळवून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
या कार्यक्रमाला माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक विजय रेणुसे, विशाल तांबे, वर्षा तापकीर, बाळा धनकवडे,अभिजित कदम, अभिषेक तापकीर, सागर भागवत, दादा देवकर, व्यंकोजी खोपडे, चेतन मांगडे, अनिल बटाने, नितीन पायगुडे, युवराज रेणुसे, मिलिंद पन्हाळकर, रेऊ अण्णा गाडेकर, चंद्रकांत कुंजीर उपस्थित होते.
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, युवा वर्ग आणि माता-भगिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग घेऊन याची शोभा वाढवली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यसिद्धी प्रतिष्ठानने सामाजिक कार्य आणि कला यांचा उत्तम समन्वय साधला.
फोटो ओळ: धनकवडी येथे संगीत संध्या कार्यक्रम वेळीमहाआरोग्य शिबिरात नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणे वाटली. यावेळी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज सावंत, राजेश्वरी सावंत.





