Pune Crime : एनआयबीएम संस्थेच्या आवारात चंदन चोरी
Updated On:

पुणे – कोंढवा भागातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग अँड मॅनेंजमेंट (एनआयबीएम) संस्थेच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली.
एनआयबीएम संस्थेतील सुरक्षारक्षक प्रमोद कटके याने यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेचे आवार विस्तीर्ण आहे. संस्थेच्या आवारातील वसाहतीजवळ नाला आहे. नाल्याशेजारी असलेले चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे तपास करत आहेत.





