Sanchita Ugale : “संचू उठ ना… मला आई म्हण ना… का असं केलंस गं?” लेकीचं पार्थिव पाहून आईचा काळीज चिरणारा आक्रोश
Sanchita Ugale : वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी संचिताने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली असून, तिच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Sanchita Ugale : ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री संचिता उगले हिच्या अकाली निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी संचिताने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली असून, तिच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संचिताने टोकाचं पाऊल उचल्याने तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
सध्या सोशल मीडियावर संचिताच्या अखेरच्या प्रवासाचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये तिची आई लेकीला हाका मारत, “संचू उठ ना… मला आई म्हण ना… का असं केलंस गं?” असे म्हणत हंबरडा फोडताना दिसत आहे. हा प्रसंग अनेकांच्या काळजाला चिरून जाणारा ठरत आहे.
नेमकं काय घडलं होतं?
नालासोपारा पूर्व येथील आचोळे परिसरातील साई संतोषी अपार्टमेंटमध्ये संचिता आई-वडील आणि धाकट्या बहिणीसोबत राहत होती. रविवारी संध्याकाळी तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतले. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, संचिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
हेही वाचा : Mithun Chakraborty : रस्त्यावर जेवण, जमिनीवर झोप; मोठ्या संघर्षातून उभा राहिला बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’!
कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर उगले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
View this post on Instagram
पोलिसांनी काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तिच्या आत्महत्येचे कारण समोर न आल्याने विविध चर्चा देखील सुरू आहेत.
छावा चित्रपटात साकारली होती महत्वाची भूमिका
दरम्यान, अल्पावधीतच छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी संचिता उगलेने ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील ‘दिया टंडन’ या भूमिकेतून विशेष लोकप्रियता मिळवली होती. याशिवाय ‘वागळे की दुनिया’, ‘दिलवाली दुल्हा ले जाएगी’ यांसारख्या मालिकांमध्येही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तसेच अभिनेता विकी कौशलच्या गाजलेल्या ‘छावा’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचीही चर्चा झाली होती.
हेही वाचा : Abhijit Dipke : “हल्ला करणारे लोक RSSचे होते”; जयपूरमधील घटनेनंतर अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप






