“आझाद काश्मीर…” ; पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूच्या काश्मीरबद्दलच्या विधानामुळे वाद

Sana Mir on jammu-kashmir। २०२५ च्या आशिया कपभोवतीचा भारत-पाकिस्तान वाद अजून शांत झाला नाही तोपर्यंत महिला विश्वचषकात एक नवीन वाद निर्माण झाला. पाकिस्तानच्या माजी महिला क्रिकेट कर्णधार सना मीर समालोचक पॅनेलचा भाग होती. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान, तिने एक विधान केले ज्यामुळे क्रीडापेक्षा राजकीय क्षेत्रात याची चर्चा रंगली आहे.
ही घटना पाकिस्तानच्या डावाच्या २९ व्या षटकात घडली, जेव्हा नतालिया परवेझ फलंदाजीसाठी मैदानात आली. सना मीरने सुरुवातीला ती काश्मीरची असल्याचे सांगितले, परंतु लगेचच तिचे विधान बदलले आणि ती “आझाद काश्मीर” ची असल्याचे सांगितले. नतालिया ही पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून येते, ज्याला पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणतो. या टिप्पणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, भारतात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त झाला.
सोशल मीडियावरून दिले स्पष्टीकरण Sana Mir on jammu-kashmir।
माजी कर्णधार सना मीरने स्वतःच्या विधानाचे स्पष्टीकरण देखील दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्टीकरण देताना,”हे दुर्दैवी आहे की माझ्या विधानाचा गैरअर्थ काढला जात आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींवर अनावश्यक दबाव आणला जात आहे.” मी स्पष्ट करू इच्छिते की माझी टिप्पणी केवळ एका खेळाडूची पार्श्वभूमी आणि संघर्षांवर प्रकाश टाकण्यासाठी होती. २०२५ च्या महिला विश्वचषकात मी ज्या खेळाडूचा उल्लेख केला होता ती पाकिस्तानच्या एका विशिष्ट प्रदेशातून आली आहे आणि माझा हेतू फक्त तिचा प्रवास आणि आव्हाने अधोरेखित करणे हा होता. समालोचन करताना, आम्ही अनेकदा खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा शेअर करतो, मग त्यांचा देश किंवा प्रदेश कोणताही असो. मी त्या दिवशी इतर दोन खेळाडूंसाठी ज्या पद्धतीने केला होता त्याच प्रकारे मी या खेळाडूचा उल्लेख केला.” असे ती म्हणाली आहे.
Sana Mir is doing commentary for the ICC World Cup…
If someone is afraid of losing his/her respect
he/she thinks 10 times before saying anything
but she is from a country where there is no such thing as respect..Remove her @ICC from the panel
pic.twitter.com/gC6C9oaXR9— AT10 (@Loyalsachfan10) October 2, 2025
कृपया या विधानाचे राजकारण करू नका Sana Mir on jammu-kashmir।
पुढे तिने आपल्या पोस्टमध्ये,”समालोचक म्हणून, आमचे काम खेळावर, संघांवर आणि खेळाडूंवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्या धैर्य आणि चिकाटीच्या कथा जगासमोर आणणे आहे. माझा कोणाबद्दलही वाईट हेतू नाही किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. ज्या स्त्रोताकडून मी खेळाडूच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती मिळवली त्याने ही माहिती दिली. त्यानंतर ती बदलण्यात आली आहे, परंतु मी ती नमूद केली आहे. माझी विनंती आहे की हे फक्त खेळांच्या कक्षेत पाहिले पाहिजे” असे तिने म्हटले.





