‘बिग बॉस ओटीटी 3’ची सना मकबूल ठरली विजेती

Bigg Boss 3 OTT winner | ‘बिग बॉस ओटीटी 3’चा ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पाच स्पर्धकांमध्ये ‘काटे की टक्कर’ पहायला मिळाली. यात सना मकबूलने सर्व स्पर्धकांना मागे टाकत ट्रॉफी जिंकली. सना मकबूलच्या विजयानंतर तिचे चाहते देखील आनंदी आहेत.
रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल, नेझी आणि कृतिका हे टॉप 5 फायनलिस्ट होते. यात सना जिंकली असून तिला ट्रॉफीसह 25 लाखांचे रोख बक्षीस मिळाले आहे. बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासूनच धमाकेदार गेम खेळताना सना दिसली होती. त्यानंतर बिग बॉस ओटीटी 3 चा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अनिल कपूर यांनी विजेती म्हणून सना मकबूलचे नाव घोषित केले.
सना मकबूल कोण आहे?
सना मकबूल ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. सना मकबूलने 2009 मध्ये MTV Scooty Teen Diva मध्ये भाग घेतला होता. तिने ‘कितनी मोहब्बत 2’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘ईशान: सपना को आवाज दे’, ‘अर्जुन’, ‘आदत से मजबूर’, ‘विश’ सारखे शो केले आहेत. सना 2021 मध्ये ‘खतरों के खिलाडी 11’ मध्येही दिसली होती.
पहिल्यांदाच अनिल कपूरने शो केला होस्ट
दरवर्षी बिग बॉस ओटीटी करण जोहर होस्ट करताना दिसतो. मात्र, पहिल्यांदाच बिग बॉस ओटीटी अनिल कपूर होस्ट करताना दिसले. मात्र त्यांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा
‘लाकडी बहीण योजने’चे पैसे कधी मिळणार ? ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली खूशखबर





