Anil Kapoor Look : अनिल कपूर यांचा ‘झक्कास’ लुक; रितेश देशमुख कमेंट करत म्हणाला…
Anil Kapoor Look : अनिल कपूर यांच्या लुकवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव

Anil Kapoor Look : बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर वयाच्या ६९ व्या वर्षीही एकदम फिट आहेत. या वयातही त्यांचा ‘झक्कास’ लुक तरुणांना चांगलीच टक्कर देत आहे. सध्या त्यांचा एक लुक सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
ज्यात अनिल कपूर पूर्णपणे पांढऱ्या केसांत आणि पांढऱ्या मिशांमध्ये पाहायला मिळत आहेत. अनेकांना त्यांचा हा लुक प्रचंड आवडला आहे.
अनिल कपूर यांनी इंस्टाग्रामवर हा नवा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “कोणालाच माहित नाही, पुढे काय होणार आहे.” त्यांच्या या लूकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लूकमुळे ते डॅशिंग दिसत आहेत. Anil Kapoor Look :
Lust Stoires 3 : लस्ट स्टोरीज पुन्हा भेटीला! तिसऱ्या सीझनची घोषणा; पाहा Video
यावर सध्या चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. अनिल कपूर यांची मुलगी अभिनेत्री सोनम कपूरने देखील कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.
याशिवाय रितेश देशमुखने ‘Mind Blowing या लूकमध्ये तुम्ही किती भारी दिसत आहात’, अशी कमेंट केली आहे. Anil Kapoor Look :
View this post on Instagram
अनिल कपूर यांनी हा लूक नेमका कशासाठी केला आहे, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. मात्र, हा लूक त्यांच्या आगामी एखाद्या चित्रपटासाठी किंवा वेब सीरिजसाठी असू शकतो, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, अनिल कपूर यांनी ”मिस्टर इंडिया”, “लम्हे”, “नायक”, “दिल धड़कने दो” आणि “द नाइट मॅनेजर” सारखे उत्कृष्ट चित्रपट केले आहे. नुकतेच ते “वॉर २” मध्ये दिसले होते. Anil Kapoor Look :
हेही वाचा:
Yami Gautam: रणवीर सिंगसोबत यामी गौतमची ‘धुरंधर 2’मध्ये दमदार एन्ट्री, अॅक्शनने भरलेली खास भूमिका





