Sameer Wankhede : समीर वानखेडेंना अटकेपासून संरक्षण; 5 जुलैपर्यंत दिलासा
Updated On:

मुंबई – नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाने अटकेपासून 5 जुलैपर्यंत दिलासा दिला आहे. तसेच सीबीआयचा गुन्हा रद्द व्हावा यासाठी दाखल याचिकेवरील सुनावणी देखील तहकूब केली आहे. वानखेडे यांचे वकील ऍड. रिझवान मर्चंट यांनी ही माहिती दिली आहे.
ऍड. मर्चंट यांच्या माहितीनुसार, भ्रष्टाचार आणि खंडणीचा सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आयआरएस अधिकारी वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणी देखील हायकोर्टाने तहकूब केली आहे. तोपर्यंत समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलासा कायम केला आहे.





